बढत्यांवरून युवासेनेत झाला बेबनाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:17 AM2018-01-30T07:17:38+5:302018-01-30T07:17:48+5:30

युवासेनेत बढत्या देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे युवासेनेचे कल्याण उपजिल्हाधिकारी श्रेयस समेळ यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला असतानाच कल्याणमधील अन्य ३० पदाधिका-यांनीही आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केल्याने खळबळ उडाली आहे.

 Increasingly, the youth was unknowingly! | बढत्यांवरून युवासेनेत झाला बेबनाव!

बढत्यांवरून युवासेनेत झाला बेबनाव!

googlenewsNext

कल्याण : युवासेनेत बढत्या देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे युवासेनेचे कल्याण उपजिल्हाधिकारी श्रेयस समेळ यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला असतानाच कल्याणमधील अन्य ३० पदाधिकाºयांनीही आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केल्याने खळबळ उडाली आहे.
समेळ यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्य पदाधिकाºयांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत जिल्हाधिकारी म्हात्रे यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शिवसेनेचे नगरसेवक तथा युवासेनेचे पदाधिकारी समेळ यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे. यातून युवासेनेतील कुरबुरी समोर आल्या आहे. युवासेनेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्यांना डावलून एक ते दीड वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना दिलेल्या बढत्यांमुळे समेळ यांनी राजीनामा दिला, असे सांगण्यात आले. केवळ घराणेशाही, लाळघोटेपणा आणि नेत्यांचे पाय धरणाºयांना युवासेनेत बढती दिल्याकडे नाराजांकडून लक्ष वेधले जात आहे. युवासेनेची स्थापना होण्यापूर्वीपासून युवासेनेच्या बांधणीला सुरुवात केली आहे. याचे फलित मिळायला हवे होते. पण, ते न मिळाल्याने मनात खदखद आहे, अशी प्रतिक्रिया समेळ यांनी ‘लोकमत’कडे दिली. समेळ यांच्यापाठोपाठ युवासेनेच्या अन्य पदाधिकाºयांनी पदांचे राजीनामे जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत. विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, गट अधिकारी अशा ३० जणांनी आपले राजीनामे लेखी स्वरूपात सादर केले आहेत. बढत्या देताना विश्वासात घेतले गेले नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. आणखीन काही कार्यकर्तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तोवर राजीनामे मागे नाही

समेळ हे युवासेनेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. परंतु, पक्षात बढत्या देताना त्यांच्यावर अन्याय झाला, ही वस्तुस्थिती आहे. याचा निषेध म्हणून आजघडीला २५ ते ३० जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
आमचे राजीनामे मंजूर होतील का, हे माहीत नाही. पण, जोपर्यंत समेळ यांच्यावरील अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत राजीनामे मागे घेणार नाही, असा पवित्रा उपविभागीय अधिकारी सतीश भोसले यांच्यासह अन्य राजीनामा देणाºया पदाधिकाºयांनी घेतला आहे.

Web Title:  Increasingly, the youth was unknowingly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.