भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:53 AM2023-11-21T07:53:16+5:302023-11-21T07:53:34+5:30

मुमरी धरण कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

Indefinite hunger strike of project victims in front of Bhatsa Dam office | भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क
शेणवा : शहापूर तालुक्यातील मुमरी धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, जमीन संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे कोठारे, सारंगपुरी, खैरे या तीन गावांतील ग्रामस्थ मुमरी धरण कृती समितीच्या माध्यमातून भातसा धरण व्यवस्थापन विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी भातसा धरण व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारच्या मोबदल्यानुसार संपादित केल्या आहेत. धरणाच्या आजूबाजूला वसलेल्या गावखेड्यांतील विकासकामे करण्याकडे मात्र जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत. 

४० कुटुंबांचे आंदाेलन
सामाजिक कार्यकर्त्या सखूबाई भस्मा व स्थानिक ग्रामस्थ लक्ष्मण सोनारे, गोविंद ठाकरे व रामचंद्र वेहळे यांच्या नेतृत्वाखाली भातसा धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी धडक दिली. सारंगपुरी, खैरे, कोठारे या गावांतील ४० कुटुंबांनी कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले आहे.

 भातसा धरणातून पाइपलाइनद्वारे सारंगपुरी, खैरे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

 उर्वरित शेतजमिनीला पाणी देणे
 भूसंपादन रखडलेल्या जमिनींचे तत्काळ भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला देणे.

 मुमरी पाडा-वेटापाडा ते कोठारे आश्रमशाळा रस्ता तयार करणे.

Web Title: Indefinite hunger strike of project victims in front of Bhatsa Dam office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.