नोंदणी -मुद्रांकच्या अराजपत्रित अधिकारी-कर्मचा-यांचा बेमुदत संप; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:27 PM2021-09-21T18:27:55+5:302021-09-21T18:34:38+5:30

Thane News: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रीत अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवापासून बेमुदत संप पुकारला आहे.

Indefinite strike of non-gazetted officers and employees of registration-stamps; Demonstrations outside the Collector's Office | नोंदणी -मुद्रांकच्या अराजपत्रित अधिकारी-कर्मचा-यांचा बेमुदत संप; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

नोंदणी -मुद्रांकच्या अराजपत्रित अधिकारी-कर्मचा-यांचा बेमुदत संप; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने 

Next

ठाणे -  नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रीत अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवापासून बेमुदत संप पुकारला आहे.. जिल्ह्यासह राज्यभर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रीत अधिकारी ,कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचार्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष  डेबडे यांच्या सह राज्य कर्मचार्यांचे नेते भास्कर गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनकर्त्यांनी दुपारी निदर्शनेही केली


नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचा:यांनी या बेमुदत संपाचा इशारा प्रशासनास या आधी दिला. मात्र त्याची दखल न घेतल्याने बेमुदत संपाला आजपासून प्रारंभ झाला आहे. शासनाकडे मागील चार वर्षापासून विविध मागण्यां प्रलंबित आहेत.  त्या मागणी प्राप्त करून घेण्यासाठी या राज्यस्तरीय बेमुदत संपाचा निर्णय कर्मचा:यांनी घेतला आहे. या संपाव्दारे कर्मचा:यांकडून सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करण्यात याव्या. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणो. रिक्त पदे तात्काळ भरणो. कोरोनामुळे मयत झालेल्या अधिकारी,कर्मचा-यांचे कुटूंबियांना तात्काळ 5० लाखाची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेणे आदी मागण्या या कर्मचा-यांनी लाऊन धरल्या आहेत. 

Web Title: Indefinite strike of non-gazetted officers and employees of registration-stamps; Demonstrations outside the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे