भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:37 AM2017-11-30T05:37:55+5:302017-11-30T05:38:29+5:30
भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे.
मुंबई : भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देश, संस्कृती, परिस्थितीमध्ये राहणाºया लोकांमध्ये संगीताच्या माध्यमातून उत्तम आदान-प्रदान होऊ शकते,
असे मत ‘द क्वार्टेट’ या
जगप्रसिद्ध झॅज बॅण्डचे प्रमुख एरी रोलॅण्ड यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
एरी रोलॅण्ड त्यांच्या तीन सहकाºयांसह १० दिवसांच्या भारत दौºयावर आले असून ते मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथे विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. स्वतंत्र भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकी दूतावासाने मुंबईत ‘द क्व ार्टेट’ बॅण्डचा कार्यक्रम आयोजित केला होता. मैफलीची भैरवी सुप्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायिका डॉ. वसुमती बद्रीनाथन यांच्या राग दरबारी कानडाने झाली. ‘द क्वार्टेट’च्या तालावर डॉ. वसुमती यांनी स्वत:च्या बंदिशीला सूर दिला आणि एक अनोखे फ्युजन सादर केले. या सांगीतिक कार्यक्रमाआधी अमेरिकी दूतावासाच्या अधिकारी व्हिक्टोरिया यांनी भारत-अमेरिकेतील वृद्धिंगत होणाºया राजनैतिक संबंधांबाबत सदिच्छा व्यक्त केल्या.