फ्रान्सच्या तुलनेत भारत व्यसनमुक्त होण्याचे प्रमाण 70 टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:30 PM2018-06-18T21:30:05+5:302018-06-18T21:30:05+5:30
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात.
डोंबिवली- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात. याउलट फ्रान्सचा अभ्यास केला असता तिथे आधुनिक सोयीसुविधा दिल्या जात असल्या तरी केवळ 3 टक्केच रूग्ण बरे होतात. भारतात कुटुंबियांकडून मिळणारा आधार यामुळे रूग्णाची बरी होण्याची शक्यता वाढते. हा सपोर्ट फ्रान्समध्ये रूग्णाला मिळत नाही, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.
मनोदय ट्रस्ट व मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर यांच्या वर्धापन दिन व जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त एक पाऊल व्यसनमुक्तीकडे .. या कार्यक्रमांतर्गत डॉ. आनंद नाडकर्णी लिखीत मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन व चर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पुणतांबेकर बोलत होत्या. हा कार्यक्रम रविवारी ब्राह्मण सभेत पार पडला. मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन प्रसिध्द अभिनेता सुयश टिळक आणि वेध अॅक्टींग अकादमीच्या मधुरा ओक यांनी केले. द्विज पुरस्काराने सन्मानित समाजसेवक मधुकर गिते यांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला. मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना पुणतांबेकर आणि मधुकर गिते यांनी उत्तरे दिली.
पुणतांबेकर म्हणाल्या, व्यसनधीन रू ग्ण हा उपचारापेक्षा कुटुंबियांच्या आधारामुळे अधिक सुधारतो. उपचार घेतल्यानंतर केंद्राशी संपर्कात राहणो गरजेचे असते. रूग्णाला टेन्शन येत असेल तर समुपदेशन केले जाते. एखादा उपचार घेतल्यावर दारूच्या पहिल्या ग्लासापासून दूर राहावे लागते. नाहीतर आजार पुन्हा उलटू शकतो. त्यासाठी रूग्णाला पथ्यांचे पालन करावे लागते. व्यसनधीनता हा कुटुंबाचा आजार आहे. त्यामुळे सगळ्य़ांना बदलण्याची गरज आहे. व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रस होतो. त्यांच्या व्यसनाधीनतेचा त्रस महिलेला अधिक होतो. त्यामुळे महिलांमध्ये अपराधीची भावना निर्माण होते. व्यसनधीन व्यक्ती रात्री व्यसन करून घरी येते तेव्हा कुटुंबियांनी नकारत्मक भावनेचा विचार करावा. त्या व्यक्तीला काहीही बोलू नये. ती व्यक्ती मुद्दाम भांडण काढण्याचा प्रयत्न करते. कारण त्या व्यक्तीला भांडण न केल्यास सकाळी अपराधीपणाची भावना निर्माण होते.
चौकट-इंटरनेटचा सतत वापर हे देखील एक व्यसनच
इंटरनेटचे व्यसन ही सध्या पाहायला मिळते. आपण गॅजेटवर अधिक अवलंबून राहू लागलो आहे. याला आयएडी म्हणजेच वर्तनात्मक व्यसन म्हटले जाते. या रूग्णासाठी मुक्तांगणमध्ये एक वेगळे विभाग तयार करावा लागला. एखाद्या गोष्टीचा दुरूपयोग आपण करीत नाही ना हे पाहिले पाहिजे. विवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे. इंटरनेट, फोन दिवसातून एवढाच वेळ वापरला पाहिजे हे मनाशी पक्के केले पाहिजे. जेवताना टीव्ही बंद करून कुटुंबियांशी संवाद साधला गेला पाहिजे. मुलांना जेवताना ही मोबाईल हातात लागतो. या मुलांना पुन्हा चिऊ-काऊच्या गोष्टीकडे घेवून जाण्याची गरज आहे. पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम दिला पाहिजे. जो वेळ मुलांना दयाल त्यात मग टीव्ही, मोबाईल नक ो. आपण कसे वागतो याकडे मुलांचे लक्ष असते. त्यामुळे स्वत:मध्ये बदल करा, असे ही पुणतांबेकर यांनी सांगितले.