ठाणेकरांकरिता आता स्वदेशी कोव्हॅक्सिनच उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:42 AM2021-03-17T04:42:18+5:302021-03-17T04:42:18+5:30
कोविडशिल्डचा पाहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना महापालिकेच्या सहा ठिकाणीच मिळणार दुसरा डोस लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात व्यापक प्रमाणात ...
कोविडशिल्डचा पाहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना महापालिकेच्या सहा ठिकाणीच मिळणार दुसरा डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरात व्यापक प्रमाणात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रात, तर ११ खाजगी रुग्णालयात आता स्वदेशी कोव्हक्सिन लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली असून, ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस शहरातील सहा ठिकाणीच घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लससारखीच असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोव्हॅक्सिन लस घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाइन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांना वेळेत लस मिळावी यासाठी ठाण्यातील महापालिका आरोग्य केंद्रात तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. यामध्ये ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, जितो हॉस्पिटल, ठाणे पोस्ट कोविड सेंटर माजिवडा, कौसा स्टेडियम, हाजुरी (अँटिजन टेस्टिंग सेंटर), सह्याद्री (अँटिजन टेस्टिंग सेंटर ), आंबेडकर भवन (अँटिजन टेस्टिंग सेंटर ), किसननगर (एटीसी), कोरेस (अँटिजन टेस्टिंग सेंटर), रोझा गार्डेनिया (अँटिजन टेस्टिंग सेंटर) कौसा ( अँटिजन टेस्टिंग सेंटर), कोपरी प्रसूती रुग्णालय, आपला दवाखाना आनंदनगर, आपला दवाखाना रामनगर, ढोकाळी आरोग्य केंद्र मेंटल हॉस्पिटल, सी. आर. वाडिया (अँटिजन टेस्टिंग सेंटर), अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आनंदनगर आरोग्य केंद्र, आझादनगर आरोग्य केंद्र, बाळकुम आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र, टीएमसी काजूवाडी आरोग्य केंद्र, कळवा आरोग्य केंद्र, लक्ष्मी चिरागनगर आरोग्य केंद्र, माजिवडा आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र मुंब्रा हेल्थ सेंटर नौपाडा आरोग्य केंद्र शील हेल्थ सेंटर, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र आणि वीर सावरकरनगर आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे.
तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, सफायर, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हायलँड हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि कौशल्या रुग्णालय आदी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ज्या नागरिकांनी कोविडशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, कोपरी हेल्थ सेंटर, कौसा हेल्थ सेंटर, मनोरमानगर हेल्थ सेंटर आणि वर्तकनगर हेल्थ सेंटर या ठिकाणीच दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याच केंद्रावर जाऊन कोविडशिल्डचा दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले.
सर्व सरकारी सेंटरमध्ये लसीकरण विनामूल्य असून, खासगी सेंटरमध्ये प्रतिडोस रु. २५० आकारण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत पूर्व ऑनलाइन बुकिंग क्षमता ठेवण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य केंद्रात ३० टक्के, तर खासगी रुग्णालयात १०० टक्के ऑनलाइन बुकिंग स्लॉट करण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
.........
वाचली