इंदोरीकरप्रकरणी वंचित आघाडीचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:24 AM2020-03-06T05:24:00+5:302020-03-06T05:24:15+5:30

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Indiscriminate fast deprivation of the deprived front | इंदोरीकरप्रकरणी वंचित आघाडीचे बेमुदत उपोषण

इंदोरीकरप्रकरणी वंचित आघाडीचे बेमुदत उपोषण

Next

ठाणे : भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी आणि चर्मकार समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी फिर्याद करून सहा दिवसांनंतरही ह.भ.प. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न केल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला. या कीर्तनातील वक्तव्याविरोधात चव्हाण यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यासंदर्भात चौकशी करून दोन दिवसांत संविधानाचा अवमान आणि दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी २९ फेब्रुवारीला दिले. सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा इंदोरीकर जाहीर माफी मागत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Indiscriminate fast deprivation of the deprived front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.