शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी सृजनात्मक कार्यात आपले योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:38+5:302021-07-04T04:26:38+5:30
ठाणे : प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या विचारांना उजाळा देऊन शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी नवनवीन सृजनात्मक कार्यात आपले योगदान दिले ...
ठाणे : प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या विचारांना उजाळा देऊन शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी नवनवीन सृजनात्मक कार्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी .शुक्रवारी आपल्या मनोगतात केले.
कार्यक्रमाची भूमिका विशद करताना अंतर्गत गुणवत्ता संवर्धन कक्षाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा राजेबहादूर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. अजय भामरे, डॉ. प्रमोद पाबरेकर, डॉ. माधुरी पेजावर, डॉ. पी. एन. माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयातील दोनशेहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजा रॉय अब्राहम यांनी केले.