धक्कादायक! उल्हासनगरातील अंबिका मंदिरात गोणीमध्ये सापडले बाळ; रविवारी पहाटेची घटना

By सदानंद नाईक | Published: November 3, 2024 10:58 AM2024-11-03T10:58:57+5:302024-11-03T11:00:56+5:30

विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिल्यावर बाळाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले आहे.

Infant Baby girl found in sack at Ambika temple in Ulhasnagar Sunday morning incident | धक्कादायक! उल्हासनगरातील अंबिका मंदिरात गोणीमध्ये सापडले बाळ; रविवारी पहाटेची घटना

धक्कादायक! उल्हासनगरातील अंबिका मंदिरात गोणीमध्ये सापडले बाळ; रविवारी पहाटेची घटना

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, अंबिका मंदिराच्या पायऱ्यावर रविवारी पहाटे ५ वाजता एका गोणी मध्ये स्त्री जातीचे बाळ ठेवल्याचा प्रकार उघड झाला. समाजसेवक संदीप डोंगरे व राकेश माने यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिल्यावर, बाळाला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, येथील अंबिका मंदिराच्या पायऱ्यावर ठेवलेल्या गोणीत हालचाल होतांना काही नागरिकांना दिसलें. त्यांनी याबाबतची माहिती समाजसेवक संदीप डोंगरे व राकेश माने यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडली असता त्यामध्ये नुकतेच जन्मलेले स्त्री जातींचे जिवंत बाळ दिसले. त्यांनी याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस व समाजसेवक संदीप डोंगरे, राकेश माने यांनी बाळाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरु केले असून बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

समाजसेवक संदीप डोंगरे व राजेश माने यांनी बाळ अंबिका मंदिरात सापडल्याने, बाळाचे नाव अंबिका असे ठेवले. विठ्ठलवाडी पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.

Web Title: Infant Baby girl found in sack at Ambika temple in Ulhasnagar Sunday morning incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.