अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ट मोबाईल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:27+5:302021-08-24T04:44:27+5:30

अंबरनाथ : अंबरनाथच्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्यावतीने शालेय पोषण अभियानांतर्गत शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ...

Inferior mobiles returned from Anganwadi workers | अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ट मोबाईल परत

अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ट मोबाईल परत

Next

अंबरनाथ : अंबरनाथच्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्यावतीने शालेय पोषण अभियानांतर्गत शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी साेमवारी सामूहिकरित्या मोबाईल वापसी आंदोलन केले.

शासनाच्यावतीने पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये शासकीय कामकाज करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते. मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन-उंची तक्ता तसेच गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचे वाटप याबाबत सविस्तर माहिती भरण्यात येते. या मोबाईलची क्षमता कमी असल्याने हे काम करताना मोबाईल वारंवार हँग होणे, मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून ताे रिपेअरिंगला नेला असता त्यासाठी होणारा तीन ते आठ हजार रुपये खर्च हा सेविकांना झेपत नाही. शासनाने दिलेले पोषण ट्रॅकर ॲप मोबाईलमध्ये रॅम कमी असल्याने डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना ते आपल्या घरगुती वापरातील मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागते. हे ॲप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक सेविकांना इतरांची मदत घ्यावी लागते. मात्र हे काम दैनंदिन स्वरूपाचे असल्याने ते राेज शक्य हाेत नाही. तसेच या ॲपमध्ये डिलीटचा पर्यायच नाही. वर्गवारी किंवा लाभार्थींचे गट बदलणे दैनंदिन करण्याची कामे इत्यादी सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन नाही. ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आहे. त्यामुळे साेमवारी अंबरनाथ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी सामूहिक आंदोलन केले. तसेच शासनाने दिलेले हे मोबाईल परत केले आहेत.

----------------------

फोटो

Web Title: Inferior mobiles returned from Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.