ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

By पंकज पाटील | Published: April 14, 2023 05:11 PM2023-04-14T17:11:06+5:302023-04-14T17:12:17+5:30

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते.

Inflammable chemical transport goes awry tanker catches fire at chemical company badlapur | ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

googlenewsNext

बदलापूर: बदलापूर मानकीवली एमआयडीसीमध्ये असलेल्या रेडियंट केमिकल कंपनीत रसायन उतरवण्यासाठी आलेल्या टँकरलाच आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीच्या घटनेत दोन कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ऐरोलीच्या बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. रात्री ही केमिकल कंपनी बंद असल्याने त्या ठिकाणी टँकर उतरवण्यासाठी तिघा कामगारांना ठेवण्यात आले होते. हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करणे आणि ते ज्वलनशील रसायन कंपनीच्या आतमध्ये असलेल्या टॅंकमध्ये भरताना मोठी दक्षता घेण्याची गरज असते.

मात्र गुरुवारी हा टँकर आल्यानंतर त्याच्यातील रसायन कंपनीच्या टॅंकमध्ये भरत असताना अचानक त्या केमिकलने पेट घेतला. टँकरच्या केमिकलचा वॉल सुरू राहिल्याने हे संपूर्ण रसायन जळू लागले आणि त्यात कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये असलेला टँकर देखील अग्नीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासोबतच उल्हासनगर आणि अंबरनाथच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

ही या कंपनीत इतरत्र पसरू नये आणि शेजारी असलेल्या कंपनींना त्याची झळ बसू नये यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्तीचे प्रयत्न केले. टँकर जवळ उभ्या असलेल्या दोघा कामगारांना या आगीची झळ बसली असून संजय पासवान आणि हे तरुण गंभीर रित्या भाजल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ऐरोली येथील बर्न सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे.

अत्यंत ज्वलनशील रसायन हाताळत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र ती सुरक्षा न घेतल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मोबाईलच्या रेडिएशनमुळे देखील आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनीत टाकण्यात येणारे रसायन हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याच्याजवळ मोबाईल देखील वापरणे धोकादायक असते.

आगीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने देखील फळ काढला. त्यामुळे कंपनीची सुरक्षा किती ढिसाळ होती हे उघड झाले आहे.

Web Title: Inflammable chemical transport goes awry tanker catches fire at chemical company badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.