महागाईने तेल ओतल्याने स्वंयपाकघरात संतापाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:19+5:302021-09-08T04:48:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाकाळात महागाई वाढल्याने स्वयंपाक घरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात बचत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाकाळात महागाई वाढल्याने स्वयंपाक घरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात बचत ही शून्य टक्क्यांवर आली आहे. गेले अनेक दिवस सर्वच जण महागाईने होरपळत आहेत. महागाई कमी व्हायचे नाव घेत नसल्याने प्रत्येकाच्या घरातील किचनचे बजेट बिघडले आहे. एकीकडे सिलिंडरच्या दर वाढत आहे तर दुसरीकडे रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यासह डाळी ही कडाडल्या आहेत. यामुळे स्वयंपाकघरात गृहिणींचा संतापाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने प्रत्येक मध्यमवर्गीय, गोरगरीब हा महागाईच्या विळख्यात अडकला आहे. सांगा कसे जगायचे? हा प्रश्न सरकारला विचारला जात आहे.
१) तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च
वस्तू वाढलेला खर्च (टक्क्यांमध्ये)
खाद्य तेल : १२० टक्के
धान्य : १५ टक्के
शेंगदाणे : १५ टक्के - २० टक्के
साखर : ५ टक्के
साबुदाणा : ५ ते ६ टक्के
चहापूड : २० ते ३० टक्के
डाळ : १५ टक्के
गॅस सिलिंडर : ८० ते ९० टक्के
पेट्रोल-डिझेल : ५० ते ६० टक्के