अनलॉकनंतर भाजीपाल्याला महागाईची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:16+5:302021-06-23T04:26:16+5:30
ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये ...
ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये गवार, पडवळ, मटार शिराळेने शतक ओलांडले असल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. तसेच, कांदादेखील किलोमागे पाच रुपयांनी महागला आहे.
पालेभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर
कोथिंबीर : २५ रु.. जुडी। ४० रु. जुडी
मेथी : ५० रु. जुडी ५०रु. जुडी
शेपू : ५० ते ६० रु. जुडी। २० रु. जुडी
चवळी : १५ ते २० रु. जुडी। ३० रु. जुडी
कांदापात : २० रु. जुडी। ३० रु. जुडी
लालमाठ। २० रु. जुडी। २५ ते ३० रु. जुडी
चवळी। १५ ते २० रु. जुडी १५ ते २० रु. जुडी
पालक १५ ते २० रु. जुडी। २० ते २५ रु. जुडी
------------------------------------------
फळभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर
वांगी ८० रु. किलो । १०० रु. किलो
भेंडी। १०० रु. किलो। १०० रु. किलो
फ्लॉवर ८० रु. किलो। ८० रु. किलो
कोबी। ८० रु. किलो। ८० रु. किलो
फरसबी। १०० रु. किलो। १६० रु. किलो
शिराळे। १०० रु. किलो। १४० रु. किलो
मटार। १०० रु. किलो। १४० रु. किलो
पडवळ। ८० रु. किलो। १४० रु. किलो
टमाटा। ४० रु. किलो। ४० रु. किलो
लालभोपळा। ६० ते ७० रु. किलो। ६० ते ७० रु. किलो
गवार। ८० रु. किलो। १४० रु. किलो
------------------------------------------
कांदा पाच रुपयांनी महागला आहे. कांदा सध्या होलसेलमध्ये २२ ते २४ रु. किलो, तर किरकोळमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले जात आहेत. आधी कांदा होलसेलमध्ये १७ ते २० रु. किलो आणि किरकोळमध्ये २५ ते ३० रु. किलोने मिळत होते.
------–-----------------------------
पावसाळा सुरू झाला की, कांद्याची आवक कमी होते. सध्या पण तीच परिस्थिती आहे. बाजारात कांदा कमी प्रमाणात येत असल्याने आवक मंदावली आहे आणि दर वाढत आहेत. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची आवक कमी केली आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याच्या अपेक्षेत ते आहेत.
- संदीप चौधरी, कांद्याचे होलसेल, किरकोळ व्यापारी
--------------------------------------------
पावसामुळे भाज्या महाग होतात. साध्य मेथी आणि कांदापात जास्त महाग आहे.
- संभाजी खेडेकर, पालेभाज्यांचे विक्रेते
------------------------------------
वळव्याच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांचे दर वाढले आहेत. सध्या ग्राहकांचा पालेभाजी, फ्लॉवर, कोबी या भाज्यांवर भर आहे. महाग झालेल्या भाज्यांना अत्यल्प मागणी आहे.
- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या
--------------------------------------
भाज्या महाग झाल्याने सध्या कडधान्याच खाल्ले जात आहेत. भाज्यांच्या तुलनेत कडधान्य स्वस्त आहेत.
- सुभद्रा गायकवाड, गृहिणी
सध्या भाज्या महाग आहेत त्यामुळे महागड्या भाज्यांना सध्या बाजूला सारत आम्ही वरणावर जास्त भर देत आहोत.
- शुभांगी मोरे, गृहिणी