कळवा रुग्णालयातील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:29 PM2020-05-11T14:29:35+5:302020-05-11T14:29:59+5:30
कळवा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणोवर आता ताण वाढत जात असून येथील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्या ला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच कामावर हजर राहण्याचे फर्मान काढले जात आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात एकामागून एक वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होत असून आणखी एका 27 वर्षीय वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा वैद्यकीय अधिकारी मेडीसीन विभागातीलच असून रु ग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्याच आरोग्याकडे रु ग्णालय व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. या रु ग्णालयात आतापर्यंत 4 वैद्यकीय अधिकारी आणि एका वैद्यकीय कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली असून क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिका:यांना कामावर येण्याची सक्ती केली जात असून हजर न झाल्यास जेवण न देण्याचा तसेच वेतन न देण्याच्या दम वरीष्ठांकडून भरला जात असल्याचा खळबळजनक आरोप या रु ग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
ठाणो शहरात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना यामध्ये पालिकेची आरोग्य यंत्रणा देखील सुटलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात एकामागून एक वैद्यकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडत असून आणखी एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला आहे. त्यामुळे ही संख्या आता 5 वर जाऊन पोचली आहे. मात्र अजूनही या रु ग्णालयातील व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
आतापर्यंत पॉझीटीव्ह आलेले सर्व वैद्यकीय अधिकारी हे मेडिसन विभागातील असून त्यांच्या संपर्कातील 9 वैद्यकीय अधिका:यांना माजीवडा येथे क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. यातीलच एका वैद्यकीय अधिका:याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मात्र असे असताना त्यांच्या संपर्कातील आणि क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या इतर 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी त्यांच्या क्वॉरन्टाइन सेंटरवर गाड्या देखील त्यांना घेऊन येण्यासाठी पाठवल्या जात आहे. त्यातही जर कामावर हजर झाले नाहीत तर जेवण देणार नाही याशिवाय वेतन रोखण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असल्याची माहिती एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे.