टेंबा रुग्णालयाची माहिती आरोग्य विभागाला सादर

By admin | Published: August 28, 2015 12:18 AM2015-08-28T00:18:20+5:302015-08-28T00:18:20+5:30

राज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव शेखर ढवळे व आरोग्य संचालनालयाने पालिकेकडे टेंबा रुग्णालयाची माहिती मागविली असून ती

Information about Temba Hospital to Health Department | टेंबा रुग्णालयाची माहिती आरोग्य विभागाला सादर

टेंबा रुग्णालयाची माहिती आरोग्य विभागाला सादर

Next

- राजू काळे,  भार्इंदर
राज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव शेखर ढवळे व आरोग्य संचालनालयाने पालिकेकडे टेंबा रुग्णालयाची माहिती मागविली असून ती पाठविण्यात आल्याचे पालिकेचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी लोकमतला सांगितले.
मीरा-भार्इंदरसह राज्यातील ३३ रुग्णालयांच्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा हवेत विरल्याचे वृत्त १० आॅगस्टच्या लोकमत अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊनपालिकेचे रखडलेले टेंबा रुग्णालय सुरू करण्याची आर्थिक कुवत नसल्याची बाजू मांडल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने हे रुग्णालय पालिकेनेच चालविण्याचा निर्णय सप्टेंबर २०१४ मध्ये दिला. परंतु, हे रुग्णालय चालविणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याने रुग्णालयाच्या खर्चासाठी जुलै २०१५ मधील महासभेने अशासकीय निधी स्वीकारण्याच्या धोरणाला मान्यता दिली आहे.
तत्पूर्वी रुग्णालय राज्य शासनामार्फतच चालविण्याचा ठराव आॅगस्ट २०१२ मधील महासभेत मंजूर करून तो दिवाणी अर्जाच्या माध्यमातून परवानगीसाठी तो उच्च न्यायालयात दाखल केला असता तो फेटाळण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालये चालविण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे मागणी केली होती.
आरोग्यमंत्र्यांनी ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ती घोषणा हवेतच राहिल्याचे वृत्त १० आॅगस्टच्या लोकमत अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत राज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणेचे उपसंचालक रत्ना रावखंडे यांनी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पडवळ यांना संपर्क साधून टेंबाची माहिती मागितली होती.

Web Title: Information about Temba Hospital to Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.