...तरच इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर करुन ठेवावे- ॲड. विशाल लांजेकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 10, 2024 04:20 PM2024-03-10T16:20:33+5:302024-03-10T16:22:30+5:30
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
ठाणे : आपल्या मृत्यू पश्चात जर आपल्या सर्व मिळकतीची, मालमत्तेची किंवा संपत्तीची वाटणी सौहार्द्यपूर्ण व्हावी अस जर आपणास वाटत असेल, तर आपण आपले इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ठेवणे आवश्यक आहे असा सल्ला २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया आणि इच्छापत्र (विल) आणि बक्षीसपत्र (गिफ्ट डीड) विषयी माहिती या सामाजिक विषयातील तज्ञ, ॲड. विशाल लांजेकर यांनी दिला.
ठाणे पुर्वतील शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांच्यातर्फे वरील विषयावर ॲड. लांजेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया समजावून सांगताना ॲड. लांजेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण कायद्यातील महत्त्वाच्या बदलांच विश्लेषण आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उपस्थित श्रोत्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितली. इच्छापत्र आणि बक्षीसपत्र विषयी माहिती देताना त्यांनी या दोन्ही विषयांचे वेगळेपण आणि ही दोन्ही पत्र प्रोसेस करताना कोणत्या आवश्यक कायदेशीर बाबींच पालन करणे महत्वाचे आहे. त्याला लागणारे रजिस्ट्रेशन प्रोसेस, चार्जेस, तसेच इच्छापत्र आणि बक्षीसपत्र हे कोणी? का? केव्हा? आणि कधी? करणे आवश्यक आहे. हे उदाहरणासहीत समजावून सांगितसे.
उपस्थित श्रोत्यांच्या या तीनही विषयांवरील विविध प्रश्नउत्तरांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियीजनात मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश राजे, उपाध्यक्ष सुभाष परब, सचिव सुभाष करंगूटकर, खजिनदार अमित ताम्हनकर, ज्येष्ठ सभासद अक्षर पारसनीस, हेमंत प्रधान आणि प्रशांत मोहिले आदी उपस्थित होते.