माहिती अधिकारामार्फत खंडणी उकळणाऱ्यांवर येणार गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:59 PM2018-10-30T23:59:56+5:302018-10-31T00:00:23+5:30

माहिती अधिकाराचा गैरवापर करुन खंडणी उकळणाºयांविरुद्ध कारवाईचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

The information will come on the tribunal through the purview of Gondal | माहिती अधिकारामार्फत खंडणी उकळणाऱ्यांवर येणार गंडांतर

माहिती अधिकारामार्फत खंडणी उकळणाऱ्यांवर येणार गंडांतर

Next

ठाणे : माहिती अधिकाराचा गैरवापर करुन खंडणी उकळणाºयांविरुद्ध कारवाईचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आजी, माजी नगरसेवकांसह काही लोकप्रतिनिधींची नावे चौकशीदरम्यान पुढे आली आहेत. यापार्श्वभूमीवर सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आणि खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची मंगळवारी भेट घेतल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकाराचा गैरवापर करणाºया काही आरटीआय कार्यकर्त्यांची यादीच काही दिवसांपूर्वी संजीव जयस्वाल यांनी ठाणे पोलिसांकडे सोपविली होती. त्यावेळीही शर्मा यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांची खंडणी विरोधी पथकाने चौकशी सुरु केली. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मधुकर पांडेय आणि प्रदीप शर्मा यांनी पालिकेत जयस्वाल यांची भेट घेतली.

ठाणे महापालिकेमध्ये आरटीआयचा गैरवापर होत असल्याची पालिका प्रशासनाची तक्रार असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश ठाणे पोलिसांना दिलेले आहेत. त्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींच्या संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

आरटीआयचा वापर खंडणी उकळण्यासाठी केल्याची कबुलीच आरोपींनी चौकशीत दिली आहे. या गैरव्यवहारांच्या साखळीत सहभागी असलेल्या अनेकांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे आणखीही काही जणांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात
सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यापाठोपाठ कल्याण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर आणि कल्याणचे उपायुक्त संजय शिंदे हेही पालिका आयुक्तालयात दाखल झाले होते.
आरटीआय कार्यकर्त्यांसंदर्भात जयस्वाल यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला शर्मा यांनी दुजोरा दिला. मात्र, भेटीतील इतर माहिती तपासाच्या दृष्टीने देणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The information will come on the tribunal through the purview of Gondal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.