काळातलावात शिकारा, हाउस बोटीची गरज, बोटिंगला मिळतोय अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:45 AM2017-12-05T00:45:20+5:302017-12-05T00:45:22+5:30

शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो

Initially, there is a shortage of people, the need for house boats, boating | काळातलावात शिकारा, हाउस बोटीची गरज, बोटिंगला मिळतोय अल्प प्रतिसाद

काळातलावात शिकारा, हाउस बोटीची गरज, बोटिंगला मिळतोय अल्प प्रतिसाद

Next

कल्याण : शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो. केवळ शनिवार व रविवारीच बोटिंगसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी महापालिकेने सोयीसुविधा पुरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याला स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनीही दुजोरा दिला आहे.
पश्चिमेत ऐतिहासिक काळातलाव आहे. त्याचा परीघ सव्वा किलोमीटरचा असून खोली २० फूट आहे. या तलावात कंत्राटदार सहारा मच्छीमार संस्थेमार्फत बोटिंग खासकरून पॅडल बोट सुरू आहे. मात्र, बोटिंगला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने तीन वर्षांसाठी ‘सहारा’ची नेमणूक केली आहे. ‘सहारा’ने वर्षाला पाच लाख रुपये उत्पन्न महापालिकेस देणे बंधनकारक आहे.
काळातलाव परिसर सुशोभीकरणावर महापालिकेने यापूर्वी आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. तलावानजीक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले असून त्यावरही किमान १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही बोटिंग केवळ शनिवारी, रविवारी आणि सुट्यांच्या दिवशीच सायंकाळी जास्त प्रतिसाद मिळतो. इतर दिवशी काही प्रतिसाद मिळत नाही. तलावाशेजारील झोपड्या हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. झोपड्यांमुळे सध्या तेथे पार्किंगची सुविधा नाही. तसेच तलाव परिसरात कॅफेटेरिया नाही. त्यामुळे येथे तलाव परिसरात विरंगुळ्यासाठी येणाºयांना रिफ्रेशमेंटची सुविधा मिळत नाही. महापालिकेने कंत्राटदाराला तलावातील बोटिंगकरिता एक शिकारा व हाउस बोट दिल्यास बोटिंगला प्रतिसाद वाढू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
बोटीचे साधे इंजीनच साडेतीन लाख रुपये किमतीचे आहे. फेरीबोटीची किंमत १२ लाख रुपये आहे. दोनआसनी पॅडल बोटीसाठी ८० हजार रुपये लागतात. तर, चारआसनी पॅडल बोटीच्या खरेदीसाठी एक लाख २० हजार रुपये खर्च येतो. ही खरेदी कंत्राटदाराला झेपणारी नाही. महापालिकेने शिकारा व हाउस बोट उपलब्ध करून दिल्यास बोटिंगचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रांत तलावाचे कंत्राट देताना राज्य सरकारच्या अध्यादेशाचे पालन केले जाते. या अध्यादेशानुसार, तलावात बोटिंगची सुविधा देणाºया मच्छीमार सहकारी संस्थेला किमान पाच वर्षे कंत्राट दिले जावे, संस्थेची गुंतवणूक करण्याची तयारी असल्यास त्याचा कालावधी १५ ते ३० वर्षे असावा. मच्छीमार संस्थेला रोजगार उपलब्ध करून देणे, हा सरकारचा उदात्त हेतू त्यामागे आहे. मात्र, केडीएमसीने ‘सहारा’ला तीन वर्षांचे कंत्राट दिले आहे.
काळातलावात अन्य एक मच्छीमार संस्था मासेमारी करते. या तलावात रो, कटला, तेलप्पा या जातींचे मासे आहेत. मासेमारीसाठी संस्था जाळे टाकत असल्याने बोटिंगला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला काम द्यावे, जेणेकरून सरकारचा उद्देश साध्य होईल. महापालिका सरकारच्या अध्यादेशाला हरताळ फासण्याचे काम करते, याकडे सहारा सहकारी मच्छीमार संस्थेने लक्ष वेधले आहे. तसेच राज्यातील अन्य ठिकाणी तलावाचे काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली दिले जाते. मात्र, केडीएमसीत हे काम बांधकाम व मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत आहे.

Web Title: Initially, there is a shortage of people, the need for house boats, boating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.