लसीकरणासाठी दीनदयाळ प्रेरणा केंद्राचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:25+5:302021-05-26T04:40:25+5:30
ठाणे : ठाण्यातील दीनदयाळ प्रेरणा केंद्र या संस्थेने आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुढाकार घेऊन लसीकरण, बाधितांची विचारपूस, ज्येष्ठांची चौकशी आणि ...
ठाणे : ठाण्यातील दीनदयाळ प्रेरणा केंद्र या संस्थेने आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुढाकार घेऊन लसीकरण, बाधितांची विचारपूस, ज्येष्ठांची चौकशी आणि समुपदेशन यावर भर दिला आहे. दीनदयाळ प्रेरणा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करून लसीकरण केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था केली आहे.
संसर्ग बाधित आणि त्यांच्या कुटुंबाला लागणारी आवश्यक मदत ते करत आहेत. नियमांचे पालन करून स्व-निधीतून सदर काम सुरू आहे. दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा. दाते यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. तर केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे हे कामाचे संयोजन करत आहेत. केंद्राचे कार्यकर्ते भरत अनिखिंडी, कल्पना राईलकर, कुमार जयवंत, निशिकांत महांकाळ, प्रदीप भावे, प्रमोद घोलप, संजीव ब्रह्मे सक्रिय आहेत.