चेन्नईतील अट्टल चोरटे जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:18 AM2018-01-05T06:18:59+5:302018-01-05T06:19:02+5:30
ठाण्यासह मुंबईतील उपनगरांमध्ये दिवसाढवळ्या चोºया करणाºया चौकडीपैकी लोकनाथ आरमुरगम शेट्टी (२२) आणि राजेश शेट्टी (४२) या अट्टल चोरट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली.
ठाणे - ठाण्यासह मुंबईतील उपनगरांमध्ये दिवसाढवळ्या चोºया करणा-या चौकडीपैकी लोकनाथ आरमुरगम शेट्टी (२२) आणि राजेश शेट्टी (४२) या अट्टल चोरट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचे सोनेही हस्तगत केले असून वागळे इस्टेट भागातील १९ लाखांच्या चोरीचीही त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील ‘शुभलक्ष्मी’ या इमारतीमधील मोहन पाटील यांच्या घरातून १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. यात पाटील यांच्या घरातून ४५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी आणि ७० हजारांची रोकड असा १२ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याच इमारतीमधील मोहनलाल जैन यांच्या घरातूनही २८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सात लाख ६३ हजार ५०० चा ऐवज चोरीस गेला होता. जैन यांच्या घरासमोरील भारती शर्मा यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता. एकाच दिवशी १९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाकडूनही तपास सुरूहोता. खबरी आणि काही तांत्रिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०१७ रोजी लोकनाथ आणि राजेश या दोघांची विलेपार्ले भागातून धरपकड केली. दोघेही मूळचे चेन्नईतील असून त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाड्यातील एक, विलेपार्ले पोलीस ठाण्यात चार आणि श्रीनगरमधील १८ डिसेंबरच्या चार चोºयांचीही कबुली या दोघांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला ३ जानेवारी आणि आता ८ जानेवारीपर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर तपास करत आहेत.
दिवसाढवळ्या चोरी करायचे
राजेश शेट्टी आणि त्याच्या साथीदारांचा दिवसाढवळ्या चोरी करण्यात हातखंडा आहे. एखाद्या सोसायटीमधील लॉक असलेली सदनिका आधीच हेरून ठेवायची. नंतर, दोघांनी पाळत ठेवून उर्वरित दोघांनी लॉक तोडून घरात शिरून चोरी करून पसार व्हायचे. आणखी दोघा साथीदारांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
70,000 हजारांची रोकड असा १२ लाख १३ हजारांचा ऐवज वागळे इस्टेट येथील ‘शुभलक्ष्मी’ इमारतीतून लंपास केला होता. तेथीलच मोहनलाल जैन यांच्या घरातूनही २८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सात लाख ६३ हजार ५०० चा ऐवज चोरीस गेला होता.