ठाण्यात एका सोसायटीमध्ये सापडले जखमी अवस्थेत हरीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:00 AM2020-06-09T10:00:20+5:302020-06-09T10:01:13+5:30
लॉकडाऊनच्या काळात जंगली प्राण्यांचा वावर शहरात वाढला असून हे हरण या सोसायटीच्या गेटपर्यंत आले होते.
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर भागात असलेल्या ऋतु इंक्लेव इमारतीच्या मागच्या गेट मध्ये जखमी अवस्थेतमधे एक हरीण सापडले. गेटमधून बाहेर निघण्यासाठी या हरणाची धडपड सुरू होती. यात ते गंभीर जखमी झाले असून काही भटक्या कुत्र्यांनी देखील या हरणाला जखमी केले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या हरणाचे वय एक वर्ष असावे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे .लॉकडाऊनच्या काळात जंगली प्राण्यांचा वावर शहरात वाढला असून हे हरण या सोसायटीच्या गेटपर्यंत आले होते.सकाळी 6.30 च्या दरम्यान ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली.आणि या हरणाला उपचारांसाठी एसपीसीए या प्राण्यांच्या दवाखान्यात उपचारांसाठी घेऊन जाण्यात आले आहे.या हरणाबरोबर आणखी एक हरण बघण्यात आले असून ते मात्र पळून गेले मात्र या हरणाचा तोंडाचा भाग गेटमध्ये अडकला आणि मागचा भाग गेटच्या लोखंडी सळ्याना घासला गेल्याने ते यात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती या सोसायटीमध्ये राहणाऱ्या दिनेश वर्मा यांनी दिली आहे .