अपघातात जखमी तरुणीचा डॉक्टरच्या हलगर्जीमुळे मृत्यू, मुंबई-नाशिक महामार्गावर घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:50 AM2019-10-01T01:50:21+5:302019-10-01T01:50:30+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास येथे भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास येथे भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. या अपघातात कुबुद्दीन अन्सारी, नबील अन्सारी, स्वरूप वाघ हे तरु ण आणि पूर्वा शेलार, गायत्री गोलतकर या
तरु णी गंभीर जखमी झाल्या. या सर्वांना तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पूर्वा हिची प्रकृती गंभीर होती. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी बराच वेळ लक्षच दिले नाही. काही वेळाने तिला खर्डी येथील ग्रामीण किंवा शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
यात वेळ गेल्याने उपचारांअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
पूर्वा हिला दुसºया रुग्णालयात हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मागणी केली, असता तेथे चालक आणि डॉक्टरच उपलब्ध नव्हते. डॉ. वाळुंज यांनीही गाडी देण्यास नकार दिला. आपत्ती व्यवस्थापन टीमने खासगी गाडीतून पूर्वाला ग्रामीण रुग्णालयात हलवले; मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने तिचा मृत्यू झला.
तर, अन्य जखमींपैकी गायत्री हिला घाटकोपर येथे, तर तीन
तरु णांवर खर्डी येथे उपचार करण्यात आले. कसारा प्राथमिक
आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कार्यरत कर्मचारी यांच्या हलगर्जीमुळे पूर्वा शेलार (२०, रा. डोंबिवली) हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दखल करण्याची मागणी पूर्वा हिच्या नातेवाइकांनी केली आहे.
कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळुंज यांच्यावर दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात अपूर्ण सुविधा लवकरच सुरू करू.
- डॉ. मनीष रेगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे