पेसामुळे बिगर आदिवासींवर होतोय अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:12 PM2018-08-23T23:12:38+5:302018-08-23T23:13:12+5:30
पांढरीचापाडा येथे कार्यक्रम; कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
- विश्वनाथ पाटील
किन्हवली : महाराष्ट्रात विविध समाजांच्या आरक्षणाची चर्चा तसेच उग्र आंदोलने सुरू आहेत. राजकीय पक्ष अनेक समाजांच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. मात्र, सरकार कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वक्त व्य पांढरीचापाडा या मठावर झालेल्या कार्यक्र मात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.
डोळखांब-पांढरीपाडा गोरक्षनाथ मठ येथे आयोजित ‘कुणबी आरक्षण आणि बिगर आदिवासी आरक्षण’ या जाहीर कार्यक्र मात ते बोलत होते. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतील चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तसेच त्यांची शिक्षित पिढी आत्महत्येच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेचे साधन म्हणून कुणबी समाज नोकरीकडे पाहत आहे.
पेसा क्षेत्रात कुणबी समाजाला शून्य टक्के, तर ओबीसी आरक्षणात ०.१ टक्क्यांपेक्षाही कमी आरक्षण या समाजाच्या वाट्याला आल्याने कुणबी शेतीतून हद्दपार होत आहेतच. पण, आता शिक्षण तसेच नोकरीतूनही हद्दपार होणार असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
आदिवासी किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासींना शासकीय हलगर्जी तसेच भ्रष्टाचाराने देण्यात आलेल्या एक लाख नोकºया खºया आदिवासींना दिल्या, तर आदिवासींचा नोकºयांचा अनुशेष भरला जाईल. वास्तविक, कुणबी समाजाला घटनात्मक तरतुदींप्रमाणे ओबीसीत आरक्षण मिळणे गरजेचे होते. मात्र, ते मिळाले नाही. कोरडवाहू शेती तसेच शेती करणाºया या समाजाला दºयाखोºयांत राहत असल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. म्हणूनच, हा समाज हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते केशव भेरे, बिगर आदिवासी संघाचे नेतृत्व करणारे काशिनाथ तिवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक कैलास पडवळ, ज्येष्ठ नेते हरिभाऊ खाडे, वसंत रसाळ, नंदू डोहळे, हरिभाऊ शिंदे, सुनील वेखंडे, रूपेश कोंगरे यासह सर्वपक्षीय कुणबी नेत्यांसह शेकडो युवक उपस्थित होते.