खारी अंबिवलीकरांच्या बोटाला १४ वर्षांनंतर शाई

By admin | Published: November 2, 2015 01:57 AM2015-11-02T01:57:10+5:302015-11-02T01:57:10+5:30

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली.

Ink after 14 years of Khari Ambivelikar's finger | खारी अंबिवलीकरांच्या बोटाला १४ वर्षांनंतर शाई

खारी अंबिवलीकरांच्या बोटाला १४ वर्षांनंतर शाई

Next

उमेश जाधव, टिटवाळा
कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली. टिटवाळा पोलीस ठाण्यातून चोख बंदोबस्त ठेवला होता.
‘अ’ प्रभाग क्षेत्रात एकूण ७ ते १५ या १० प्रभात ७० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ९१ हजार मतदान असणाऱ्या या ‘अ’ प्रभागात सकाळी अगदी शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लागल्या होत्या. तरूण- तरूणी, महिला- पुरूष व ज्येष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आनंदाने कुणाच्याही दडपणा खाली न येता बजावला. टिटवाळा जवळील खारी आंबिवली आणि मोहीली या दोन गावांतील नागरिकांनी तब्बल १४ वर्षांनी प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन उत्स्फूर्तपणे मतदान केले. आपल्या गावात नागरी सुविधा मिळत नसल्याने १९८३ सालापासून या गावांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता.
मात्र या वर्षी महापालिकेतून वगळण्यात आलेली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्याने आपल्या गावांचा विकास होईल, या आशेमुळे त्यांनी या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावातील नागरिकामध्ये मतदानाचा हक्क बजावताना प्रचंड उत्साह दिसत होता.
आम्हाला जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले की, प्रशासनाकडून आपणास मुलभूत सेवासुविधा पुरविण्यात येतील. यामुळे आम्ही यावेळी मतदान करण्यासाठी तयार झालो आहोत. असे मत सुरेश पाटील (संघर्ष समिती ) यांनी व्यक्त केले.

Web Title: Ink after 14 years of Khari Ambivelikar's finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.