ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 02:43 PM2021-10-25T14:43:10+5:302021-10-25T14:43:27+5:30

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला.

Ink work behind Kalu dam for water supply to TMC in the district including Thane - Jayant Patil | ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

googlenewsNext

ठाणे : न्याय प्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपादा मंत्री जयंत पाटील, यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांच्या पाण्याची समस्या कारमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.              

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पाणी समस्या सोडवण्याच्या विविध उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यात काही वर्षांपासून रखडलेल्या शाई व काळू धरणांचे कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ‌आव्हाड, यांच्या ग्वाहीसह स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन. दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे या पाणी पुरवठ्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. काही ठिकाणी कमी पाणी ‌कमी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणी पुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे ‌लागणार आदी विषयांवर आढावा बैटकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिवांनी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. यासह जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या तुटफूट होणार्रा पाईप लाईनचे कामं करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. त्यास आळा घालण्यासाठी व पाईट लाईन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनीही सहमती दिल्याचे पाटील यांनी सांगितले.                         

येऊर येथील जुना बंधार्याची दुरुस्ती करून त्यातील वाहून जाणार्या पाण्याचा वापर ‌ठाणे शहराच्या काही भागाला होईल. येथील जून्या बंधार्याचे पाणी खालील गळतीने वाहून जाते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती च्या सूचना दिलेले आहेत, असे पाटील म्हणाले. मुंब्रा परिसरातील डोगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापूरी बंधारे बांधावून आडवता येईल. या पाण्याचा वापर कळवा आणि मुंब्रा या प्रभागांमध्ये करून पाणी समस्या कमी करता येईल.व,असेही त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीस अनुसरुन सांगितले.  

MIDC ला आता एसटीपी प्लंनचे पाणी          
जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रियासकलींच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एम आयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लँनचा‌ वापर करून रिसायकलींग पाणी ‌व वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी सुचवलेल्या उपाययोजनेला दुजोरा ‌देत पाटील यांनी स्पष्ट केले.जुने व नवे  प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आता मधल्या काळामध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूतोवाच केले आणि सगळ्यात मोठे प्रकल्प तातडीने, वेगाने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Ink work behind Kalu dam for water supply to TMC in the district including Thane - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.