ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम : प्रथमच केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:57 AM2017-10-09T01:57:08+5:302017-10-09T01:57:19+5:30

मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला.

 Innovative initiative of Thane Police: The use of the portable lightning tower for the first time | ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम : प्रथमच केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर

ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम : प्रथमच केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर

Next

ठाणे : मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणाºया भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. यामुळे मिरवणुकीतील बंदोबस्ताबरोबरच काळ्याकुट्ट अंधारात भाविकांना लख्ख प्रकाशाची सुविधा देण्याचा अनोखा उपक्रम पोलिसांनी राबवल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली.
दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी ठाण्यात सार्वजनिक ११७ देवीच्या मूर्ती, आठ प्रतिमा, दोन घट तर खासगी १९४ मूर्ती, १२ प्रतिमा आणि ५२७ घट अशा ३११ मूर्ती, २० प्रतिमा आणि ५२९ घटांचे शहरातील वेगवेगळे तलाव आणि खाडी परिसरात विसर्जन करण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोहरमनिमित्ताने २७ सार्वजनिक पंजे आणि सहा ताबूत तसेच २६० पंजे, १२ प्रतिमा आणि नऊ ताबूत असे २८७ पंजे, १२ ताजिया, १५ ताबूत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या होत्या.
कळवा रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन मिरवणुका येत असताना तसेच मोहरमनिमित्ताने काढलेल्या मिरवणुका रेतीबंदर मुंब्रा येथे विसर्जनासाठी येत असताना अपुºया प्रकाशव्यवस्थेमुळे मिरवणुकीतील सामान्य नागरिक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही समोरील दृश्य दिसणे अवघड जात होते. त्यामुळेच अशा मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणेही पोलिसांना आव्हानात्मक होते.
यंदा हीच समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी त्यांच्यादरम्यान पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवरचा विशेष वापर मुंब्रा आणि कळवा पोलिसांनी केला.
रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी सहज नेता येईल, अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या या टॉवरचा उपयोग करण्यासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकांच्या वेळी कळवा आणि मुंब्रा भागांत उत्कृष्टरीत्या वापर करण्यात आला. त्यामुळे मोहरमच्या मिरवणुकाही कोणत्याही अडथळ्याविना पार पडल्याची माहिती स्वामी यांनी दिली. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही या अनोख्या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Innovative initiative of Thane Police: The use of the portable lightning tower for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे