जुगाराच्या अड्ड्याची चौकशी करा

By Admin | Published: May 22, 2017 01:52 AM2017-05-22T01:52:59+5:302017-05-22T01:52:59+5:30

रेल्वे स्थानक प्रबंधक आणि पोलिसांच्या संगनमातने डोंबिवलीतील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ‘ए’वर मटका-जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा आरोप

Inquire about the Junkyard | जुगाराच्या अड्ड्याची चौकशी करा

जुगाराच्या अड्ड्याची चौकशी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वे स्थानक प्रबंधक आणि पोलिसांच्या संगनमातने डोंबिवलीतील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ‘ए’वर मटका-जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा आरोप डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी स्थानकाच्या पाहणीदरम्यान केला होता. मात्र, या प्रकरणात अजूनही कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून दोषींविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी डॉ. शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि विभागीय व्यवस्थापक आर. के. गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात शिंदे म्हणतात की, आॅनलानइन लॉटरी, व्हिडिओ गेम पार्लरच्या गाळ््यांचा वाद न्यायालयात असला तरी तेथे बेकायदा जुगार-मटका चालवण्यास परवानगी असावी, हे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटिया, आरपीएफचे अधिकारी आर. के. मिश्रा आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करावी. रेल्वेने तेथे जुगार-मटका व्यवसाय करण्यासाठी त्या दुकानदारांना परवानगी दिली आहे का? ती दिली नसल्यास बेकायदा व्यवसाय रेल्वे हद्दीत सुरूच कसा राहिला, त्याला कोणाचे आशीर्वाद होते, असा सवालही शिंदे यांनी केला आहे.

Web Title: Inquire about the Junkyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.