संकेतस्थळ हॅकप्रकरणी पुन्हा चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:24 AM2018-08-27T04:24:57+5:302018-08-27T04:25:18+5:30
भार्इंदर पालिका : पासवर्ड झाला शेअर
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची वेबसाईट हॅक करण्यासाठी पासवर्ड शेअर झाल्याचा प्रकार दोन वर्षापूर्वी उघड झाला. त्याविरोधात भार्इंदर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यातून काहीही हाती न लागल्याने चौकशी गुंडाळण्यात आली. गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी पालिकेने पोलिसांकडे कोणताही पाठपुरावा न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांसह सायबर गुन्हे विभागाच्या तज्ज्ञांनी कर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
२०१६ मध्ये पालिकेचे संकेतस्थळ हॅक करून त्यातील कर विभागाच्या दंडात्मक करात फेरफार करण्याचा उपद्व्याप करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यावेळी पालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या संगणक कंपनीच्या कर्मचाºयांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी घेतलेल्या मागोव्यात कर विभागातीलच काही अधिकारी वा कर्मचाºयांनी आपला गोपनीय पासवर्ड शेअर करुन संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
यात पालिकेकडून आॅनलाईन पद्धतीने होत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीतील दंडात्मक कर परस्पर रद्द करण्याचा उपद््व्याप केला होता. यामध्ये काही विकासकांच्या बेकायदा मालमत्तांना आकारण्यात आलेल्या दंडात्मक कराचा समावेश होता. दंडात्मक कर रद्द करून त्यात मूळ मालमत्ता कराची नोंद अपलोड करण्यात आली. या प्रकाराची माहिती संगणक कंपन्यांच्या कर्मचाºयांनी संगणक विभागाला दिली.
घटनेचे गांभाीर्य ओळखून संगणक विभागातील अधिकाºयाने ही बाब कर विभागाच्या तत्कालिन सहायक आयुक्त स्वाती देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. देशपांडे यांनी त्याविरोधात भार्इंदर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्याची माहिती दंडात्मक कर रद्द करणाºयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी पुन्हा तो कर जैसे थे ठेवला. यात पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.
देशपांडे यांचीही चौकशी
स्वाती देशपांडे यांनाही चौकशीसाठी नुकतेच बोलावले होते. परंतु, त्यात नेमकी कोणती तसेच काय चौकशी झाली, ते अद्याप गुलदस्त्यात असले तरी २३ आॅगस्टपासून पोलिसांनी कर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसह संगणक विभाग तसेच कंत्राटी संगणक कंपनीच्या अधिकारी व कर्मचाय््राांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.