जम्मू-काश्मीर पोलिसांकडे चरस तस्करांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:05 AM2018-03-05T06:05:44+5:302018-03-05T06:05:44+5:30
थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई-ठाण्यात चरसची तस्करी करणाºया साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून माहिती मागवली आहे.
ठाणे - थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई-ठाण्यात चरसची तस्करी करणाºया साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून माहिती मागवली आहे.
साजीद, अब्दुल गुजली व मोहम्मद मकबूल भट या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने १ मार्चला अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस, तसेच एक लाख ७३० रुपयांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात चरससारखा अमली पदार्थ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय, जम्मू-काश्मीर पोलिसांचीही त्याबाबत मदत घेण्यात येत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तांमार्फत याबाबतचे पत्र जम्मू-काश्मीर पोलिसांना पाठवण्यात आले आहे. या पत्रातून ठाणे पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात १ मार्चला दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपशील दिला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर पोलिसांकडून त्याबाबत तपशीलवार माहिती मिळाल्यास अटक केलेल्या या तिघांकडून आणखी उकल होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुलनेने जम्मू-काश्मीरमधून आणलेला हा चरस उच्च प्रतीचा मानला जातो. त्यामुळे त्याची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किंमतही किलोमागे दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच मुंब्य्रात त्यांचे नेमके कोण कोण गिºहाईक आहेत? याचाही तपास सुरू असल्याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली.