वर्षभरात १२५८ प्रवासी बस वाहतुकीची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:14+5:302021-05-23T04:40:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या नियम डावलल्याने कल्याण आरटीओने वर्षभरात २७८ प्रवासी बस वाहतुकीवर कारवाई ...

Inspection of 1258 passenger bus traffic during the year | वर्षभरात १२५८ प्रवासी बस वाहतुकीची तपासणी

वर्षभरात १२५८ प्रवासी बस वाहतुकीची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या नियम डावलल्याने कल्याण आरटीओने वर्षभरात २७८ प्रवासी बस वाहतुकीवर कारवाई केली. यासाठी १२५८ बसची तपासणी करण्यात आली आहे. नियम न पाळणाऱ्या वाहनचालक, मालकांकडून तीन लाख ७५ हजार ३०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

कोराेनाकाळात मार्च २०२० नंतर साधारण जूनपर्यंत प्रवासी वाहतूक सपशेल बंद होती. मे महिन्यात परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी आरटीओच्या नियंत्रणाखाली काही बस कोविड नियम पाळून सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातही ज्यांनी नियम धाब्यावर बसवले, त्यांच्यावर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

त्यानंतर पुन्हा काही दिवस प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती. त्या वाहनचालकांनी नियम तोडल्याचे ठिकठिकाणी दिसून आल्याने आरटीओने कारवाई केली होती.

तीन लाखांचा दंड वसूल

आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करताना बसचालक, मालकांनी कर भरला आहे की नाही, याचीही तपासणी केली. त्यावेळी ज्यांनी कर भरला नाही, त्यांच्याकडून सुमारे ३७ लाख १६ हजार ६१७ रुपयांची करवसुली व दंडापोटी तीन लाख ७५ हजार रुपये अशी एकूण ४० लाख ९२ हजार ९१७ रुपये आकारण्यात आले आहेत.

९७ प्रकरणे निकाली

ज्यांनी दंड भरला, कर भरला अशी ९७ वाहनांच्या केसची प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच ज्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगूनही ऐकले नाही अशी ५१ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तसेच सुमारे ३९ बसचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

नाकाबंदीत कडक तपासणी

डोंबिवलीतील ट्रॅव्हल व्यावसायिकांने यासंदर्भात सांगितले की, सध्या व्यवसाय पूर्णतः बंद आहे. अत्यावश्यक स्थितीत केवळ वाहने ई-पास घेऊन बाहेर काढण्यात येतात. त्यामुळे तेव्हा कोविड नियम पाळावेच लागतात, अन्यथा ठिकठिकाणी असलेल्या नाकाबंदीवर गाड्या अडवून तपासणी होते. त्यात सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले हाेते की नाही, ते तपासले जाते.

--------

Web Title: Inspection of 1258 passenger bus traffic during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.