'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा

By सुरेश लोखंडे | Published: March 4, 2024 09:29 PM2024-03-04T21:29:12+5:302024-03-04T21:31:35+5:30

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, 'कौशल्य विकास'च्या निधी चौधरी यांचीही हजेरी

Inspection of 'Namo Maharojgar' program venue by officials in Thane, review by Industry Minister | 'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा

'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शासन आपल्या दारी, हा उपक्रम पार पडताच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून आता नमो महारोजगार मेळाव्याच्या ठाणे येथील कार्यक्रम स्थळी जाऊन प्रत्यक्ष आढावा अधिकाऱ्यांकडून आता घेतला जात आहे. त्यास अनुसरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज या 'नमो महारोजगार" मेळाव्याची पूर्वतयारी आढावा घेऊन खात्री केली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, पोलीस अपर आयुक्त महेश पाटील, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, गोपीनाथ ठोंबरे आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होती. शिनगारे यांच्यासह कौशल्य विकास च्या निधी चौधरी व प्रशासनातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला.

Web Title: Inspection of 'Namo Maharojgar' program venue by officials in Thane, review by Industry Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.