दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, भिवंडीत क्लस्टर शिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:05 AM2023-04-30T00:05:38+5:302023-04-30T00:07:17+5:30

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल.

Inspection of the damaged building by the Chief Minister, there is no option but cluster in Bhiwandi - Chief Minister Eknath Shinde | दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, भिवंडीत क्लस्टर शिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, भिवंडीत क्लस्टर शिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसे अती धोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो,त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. भिवंडीतील अति धोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिल्या.

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल. माणसांच्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

Web Title: Inspection of the damaged building by the Chief Minister, there is no option but cluster in Bhiwandi - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.