उल्हासनगर शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्याची आयुक्ताकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: August 15, 2023 05:10 PM2023-08-15T17:10:26+5:302023-08-15T17:11:23+5:30
महापालिका आयुक्तांनी शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्याची पाहणी केल्यानंतर, टर्निग पॉईंट ते गोलमैदान रस्ता दुरुस्तीची पाहणी केली.
उल्हासनगर : लाखो रुपये खर्चून दुरुस्ती केलेला शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्याची चार महिन्यात दुरावस्था झाली. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी सोमवारी रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे आदेश शहर अभियंता संदीप जाधव यांना दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, मधील शांतीनगर ते डॉल्फिन रस्ता पुनर्बांधणीला एमएमआरडीएने एका वर्षांपूर्वी मंजुरी देऊनही रस्त्याच्या कामाला सुरवात केली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच रस्त्याने शहर विकास कामाचे लोकार्पण व विकास कामाचे उदघाटन करण्यासाठी चार महिन्यापूर्वी संच्युरी मैदानात आले होते. त्यावेळी लाखो रुपये खर्चून रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना रस्त्यावरून धड चालता येत नाही. तसेच वाहनचालक महापालिकेच्या नावाचा उद्धार करीत आहेत. अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजित शेख यांनी अतिरीक्त आयुक्त करुणा जुईकर समवेत सोमवारी रस्त्याची पाहणी करून, शहर अभियंता संदीप जाधव यांना रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच मोठया दगड सोबत खडी टाकण्याचे सुचविलें आहे.
महापालिका आयुक्तांनी शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्याची पाहणी केल्यानंतर, टर्निग पॉईंट ते गोलमैदान रस्ता दुरुस्तीची पाहणी केली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर, शहरातील सर्वच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचें संकेत आयुक्त शेख यांनी दिली. महापालिका बांधकाम विभागातील सावळागोंधळ बाबत मात्र आयुक्तांनी मौन धारण केल्याने, आयुक्त विभागाच्या संबंधितांवर काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले