ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:41 AM2017-12-08T00:41:46+5:302017-12-08T00:41:57+5:30

धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणाºया विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला बुधवारी चितळसर पोलिसांनी अटक केली आहे

Inspector of molestation of woman in Thane | ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

Next

ठाणे : धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणाºया विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला बुधवारी चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हे दोघेही ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षामध्ये बसले होते. तो वसंतविहार येथील पोस्ट कार्यालयात, तर ती त्याच परिसरातील एका बँकेत नोकरीला आहे. रिक्षा माजिवडा येथून वळसा घेऊन वसंतविहारकडे जात असताना त्याने तिचा विनयभंग केला, अशी तिची तक्रार आहे. तिने आरडाओरडा केल्यानंतर वसंतविहार येथे आल्यावर काही नागरिकांनी पकडून त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तत्काळ अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, आपल्याकडून हा प्रकार अनवधानाने झाल्याचा दावा या पोस्ट कर्मचाºयाने केला. तसेच हा कर्मचारी चांगल्या वर्तनाचा असल्याचा दावाही काही महिलांनी करून त्याला सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, हा अधिकार न्यायालयाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Inspector of molestation of woman in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.