500 रुपयांऐवजी 5000 बील येतंय, महावितरण कार्यालयावर आमदाराची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:41 PM2020-08-13T13:41:29+5:302020-08-13T13:42:53+5:30
महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे.
डोंबिवली : वाढीव वीजबिल, सतत वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत, ग्राहकांना त्रास देणे योग्य नाहीत, त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नका, एखादी चांगली योजना करणे गरजेचे आहे. ज्याला 500 रुपये बिल येत होते त्यांना आता 5 हजार बिल येत आहे हे योग्य नाही. दिल्ली पटर्न राबवणे गरजेचे आहे. पत्र पाठवली पण उत्तर नाही ही शोकांतिका आहे. आम्हाला इतिवृत्त हवे आहे, एमएआरसी कडे आम्ही जाऊच नाही अशी भूमिका महावीतरणची आहे, हे योग्य नाही, अशी भूमिका आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. खंबालपाडा, कंचनगाव येथे दिवसातून 6 वेळा लाईट जाते. 7 किमी मध्ये इस्यु येत आहे. पण राज्यमंत्री असताना मेरी गो राउंड पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था केली, पण त्याची अमलबजावणी होत नाही. महावितरणचे अधिकारी दादागिरी करत असतील तर ते योग्य नाही, वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. संबंधित अधिकारी तातडीने बदली करावा, वर्क फ्रॉम होम पूर्णपणे कोलमडले आहे, संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली.
दरम्यान, खंबालपाडा विभागात 7 ठिकाणी समस्या असल्याचे आढळून आले आहे, त्याबाबत गणेशोत्सव काळाच्या आत काम।पूर्ण करण्यात येणार आहे, शुक्रवारी दिवसभर शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महावितरण अधिकाऱ्यांनी दिले