संचारबंदीमुळे शाळेची फी जमा करण्यात सूट मिळावी: मनसेचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:25 PM2020-04-17T23:25:27+5:302020-04-17T23:35:16+5:30

संचारबंदीच्या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांस्कृतिक विभागाच्या ओवळा माजिवडा विधानसभा संघाचे अध्यक्ष प्रसाद भांदिगरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Institutions should be exempted from collection of school fees: MNS's demands to Thane collectors | संचारबंदीमुळे शाळेची फी जमा करण्यात सूट मिळावी: मनसेचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

मनसेच्या सांस्कृतिक विभागाने दिले पत्र

Next
ठळक मुद्देमनसेच्या सांस्कृतिक विभागाने दिले पत्रचालू आणि आगामी शैक्षणिक वर्षामध्ये फी भरण्याचा कालावधी वाढवून मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीच्या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांस्कृतिक विभागाच्या ओवळा माजिवडा विधानसभा संघाचे अध्यक्ष प्रसाद भांदिगरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये भांदिगरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळेची फी भरण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे चालू आणि आगामी वर्षांसाठी म्हणजेच २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये फी भरण्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी आणि पालकांकडील पैशांची उपलब्धता ही तुटपुंजी असेल. त्यामुळे माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सर्व मंडळांच्या शाळा व्यवस्थापकांनी पालकांकडून चालू वर्षांची आणि आगामी वर्षांची फी गोळा जमा करताना सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. संचारबंदीच्या काळात फी जमा करण्याची सक्तीही केली जाऊ नये. संचारबंदी पूर्णपणे शिथिल झाल्यानंतरच फी घ्यावी. राज्य शासनानेही यावर शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना आदेश काढण्यात यावेत, असेही भांदिगरे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाºयांसह ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: Institutions should be exempted from collection of school fees: MNS's demands to Thane collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.