परिवहन समित्या स्थापन करण्याचे शाळांना निर्देश, सुरक्षेवर झाली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:57 AM2017-11-24T02:57:58+5:302017-11-24T02:58:25+5:30

ठाणे जिल्ह्यात ११८ शाळांनी त्यांच्या परिवहन समित्या गठीत केल्या आहेत. उर्वरित शाळांच्या प्राचार्यांनी समित्या स्थापण्याची कार्यवाही तत्काळ करावी.

Instructions on schools for establishment of transport committees, safety discussions | परिवहन समित्या स्थापन करण्याचे शाळांना निर्देश, सुरक्षेवर झाली चर्चा

परिवहन समित्या स्थापन करण्याचे शाळांना निर्देश, सुरक्षेवर झाली चर्चा

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात ११८ शाळांनी त्यांच्या परिवहन समित्या गठीत केल्या आहेत. उर्वरित शाळांच्या प्राचार्यांनी समित्या स्थापण्याची कार्यवाही तत्काळ करावी. स्कूलबस सुरक्षेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड नसल्याच्या सूचना परिवहन अधिकाºयांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिल्या. यामुळे निष्काळजी असलेल्या शाळांचे धाबे दणाणले आहे.
शाळेमधील परिवहन समित्यांच्या बैठका तीन महिन्यांनी नियमित होणे गरजेचे आहे. मात्र, त्या होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी व असुरक्षित वाहनांतून होत असल्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. अशा वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. शाळांनी नवीन बस घ्याव्या किंवा कंत्राटदारांकडून चांगल्या बस भाडेतत्त्वावर घ्याव्यात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेशी तडजोड करू नये. पालकांनीदेखील अधिकृत परवाना असलेल्या स्कूलबसमधून मुलांची नेआण करावी. त्याचप्रमाणे शाळांच्या प्रवेशद्वारावरच मुलांची चढउतार होते. त्यामुळे रस्त्यावरील इतर वाहतुकीवर परिणाम होतो, अपघात होऊ शकतात आदी विषयांवर चर्चा झाली.
>...तर खटला नाही
स्कूलबस कंत्राटदाराशी सामंजस्य करार करावा. पण कोणत्याही कृत्याबद्दल संबंधित प्राचार्य किंवा शाळा व्यवस्थापनाविरु द्ध खटला भरणार नाही किंवा कारवाई केली जाणार नाही, असेही परिवहन अधिकाºयांनी स्पष्ट केले.

Web Title: Instructions on schools for establishment of transport committees, safety discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.