माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेच्या जागेसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:59 PM2018-12-07T19:59:59+5:302018-12-07T20:10:54+5:30

ठाणे : ध्वज दिन निधी संकलनाकडे आपण एरव्हीच्या एखाद्या उद्दिष्ट्यपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये तर अधिकाधिक निधी संकलित करावा असे ...

Instructions to the Tahsildars of Thane Collectorate for the ex-servicemen's health plan | माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेच्या जागेसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना निर्देश

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Next
ठळक मुद्दे* सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ;मागील वर्षी दीड कोटींचा निधी संकलीतध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात एक कोटी ८४ लाख इतके उद्दिष्ट्य होते

ठाणे : ध्वज दिन निधी संकलनाकडे आपण एरव्हीच्या एखाद्या उद्दिष्ट्यपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये तर अधिकाधिक निधी संकलित करावा असे आवाहन करून माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेबाबत लागणाऱ्यां  जागेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठाणे तहसीलदार यांना निर्देश दिले आहेत, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीवेळी स्पष्ट केले. या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसे निर्देश
येथील जिल्हा नियोजनभवनमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१८ चा शुभारंभ कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय. सैनिकांविषयी कृतज्ञतेच्या भावनेतून ध्वज दिन निधी संकलन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम प्राणाची आहुती देणाऱ्यां  शूरवीर जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. वीर माता व वीर पत्नींचाही यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. तर महाराष्ट्रातील १०८ शौर्य सन्मान प्राप्त सैनिकांच्या शौर्यगाथा शब्दबध्द केलेल्या ‘महारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती.
ध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात एक कोटी ८४ लाख इतके उद्दिष्ट्य होते, त्यापैकीपैकी ८५ टक्के म्हणजे एक कोटी ५८ लाखांचा निधी संकलित करण्यास यश मिळाले. यासाठी उत्तम कामगिरी केलेले ठाणे येथील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी तसेच इतर अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन संन्मानीत करण्यात आले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. महारथी या पुस्तकातील शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवांवर आधारीत असल्याने वाचकांना खूपच प्रेरणादायी ठरतील आणि देशासाठी लढणाऱ्यां  सैनिकांप्रती आपला आदर अधिक वाढेल, तसेच भारतीय सैन्य दल देश संरक्षणासाठी आपल्या जीवाची कशी बाजी लावते ते कळेल, असे या पुस्तकाचे लेखक दिलीप गुप्ते यांनी यावेळी सांगितले.
.........

Web Title: Instructions to the Tahsildars of Thane Collectorate for the ex-servicemen's health plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.