राजकीय पक्षां समक्ष ईव्हीएम मतदान यंत्रांचे संगणकीय प्रणालीव्दारे सरमिसळीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 07:32 PM2019-09-30T19:32:58+5:302019-09-30T19:36:46+5:30
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकांसाठी विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फस्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय ...
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकांसाठी विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फस्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने सोमवारी ठाणेजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. याशिवाय या यंत्राचे विधानसभा निहाय वाटपही झाले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात मतदान यंत्रांचे सरमिसळीकरण करते वेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या १२० टक्के बॅलेट युनिट व ११३ ते ११५ टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १२७ टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया आज राबविण्यात आली.
आता संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात आलेल्या या सरमिसळ प्रक्रियेनुसार तुर्भे येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार आहे. या प्रथम टप्यातील सरमिसळ प्रक्रियेनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रि या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे. त्यावेळी मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाणार असल्याचे यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करते वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले .
..........
फोटो - ३०ठाणे मतदान यंत्र वितरण