शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:49+5:302016-03-16T08:36:49+5:30
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आज पुन्हा चव्हाट्यावर आला. काही दिवसांपासून नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि पाणी पुरवठा सभापती
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आज पुन्हा चव्हाट्यावर आला. काही दिवसांपासून नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्यात सुरू असलेल्या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळाला.
मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडून निविदा अडवल्या जातात. त्यावर वेळेत निर्णय घेतला जात नाही असा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला. त्यांच्या सूरात सूर मिसळत पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनीही मुख्याधिकाऱ्यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही महिन्यात मी अनेकवेळा प्रशासनाला पत्रे पाठवली आहेत. मात्र त्यावर कारवाई केली जात नाही, पत्रांना उत्तरे दिली जात नाही, असा आरोप करत नगराध्यक्ष म्हात्रे यांना जाब विचारला. त्यावर संतापलेल्या म्हात्रे यांनी वडनेरे यांना ‘सभाशास्त्राचा अभ्यास करुन या, अन्यथा बाहेर निघून जा, जास्त बोलाल तर बाहेर काढू’ अशा शब्दांत फटकारल्याने सभेत काही काळ वातावरण तापले होते. मात्र या प्रकरणाने दोघांमधील वाद अद्याप संपलेला नाही हे सिद्ध झाले.
सत्ताधारीच सभापतींना प्रश्न विचारतात तर आम्ही काय करायचे असा सवाल भाजपा गटनेत्यांनी केला.