अंतर्गत मेट्रोचा आराखडा १४ मार्चपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:52 AM2018-03-07T06:52:08+5:302018-03-07T06:52:08+5:30
ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
ठाणे - ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये दोन्ही प्रकल्पांच्या मार्गिकेमध्ये किरकोळ बदल करून अंतिम आराखडा १४ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. साधारणत: मार्च २०१९ मध्ये या कामाची सुरुवात होईल, अशा पद्धतीने या प्रकल्पाचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणाºया केएफडब्ल्यू या जर्मनीस्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधी स्टिफिनी, महाराष्ट्र मेट्रोचे सल्लागार रामनाथ, दीक्षित, पीआरटीएस प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनकुमार, समन्वय अधिकारी गौतम जसरा आदी अधिकारी उपस्थित होते.
अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वे स्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, घाणेकर नाट्यगृह अशी मार्गिका असेल.
केंद्राच्या मंजुरीनंतर निविदा
या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर त्यास केंद्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्प अंमलबजावणी बोर्ड(पीआयबी) मंडळाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रि या सुरू होणार आहे.