मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतगर्त बदल्या

By धीरज परब | Published: July 17, 2023 04:36 PM2023-07-17T16:36:09+5:302023-07-17T16:36:19+5:30

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील प्रलंबित असलेल्या तब्बल १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत .

Internal transfers of 199 Police Officers in Meera Bhayander - Vasai Virar Police Commissionerate | मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतगर्त बदल्या

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतगर्त बदल्या

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील प्रलंबित असलेल्या तब्बल १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत . त्यात २७ पोलीस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक व ११२ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे . 

 मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालय १ ऑक्टोबर २०२० रोजी कार्यरत झाले .  गेल्या पावणेतीन वर्षांच्या काळात नव्याने अनेक पोलीस अधिकारी आयुक्तालयात दाखल झाले आहेत . पहिले पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या बदली नंतर मधुकर पांडेय यांची नियुक्ती शासनाने केली आहे . परंतु  ठाणे व पालघर ग्रामीण पोलीस कार्यकाळात असलेले अनेक पोलीस उपनिरीक्षक तसेच आयुक्तालय झाल्या नंतर नेमण्यात आलेले अनेक उपनिरीक्षक , सहायक निरीक्षक आदींच्या बदल्या प्रलंबित होत्या . दाते यांच्या बदली मुळे अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या खोळंबल्या होत्या . 

पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने आता अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी तब्बल १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत . त्या मध्ये नव्याने आयुक्तालयात आलेल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे . बदल्या केलेल्या बहुतांश अधिकाऱ्यांचा २ वर्षे व त्यापेक्षा जास्त कार्यकाळ त्यांच्या पोलीस ठाणे वा पोलीस विभागात पूर्ण झालेला होता . काही अधिकारी तर ठाणे वा पालघर ग्रामीण पोलीस काळा पासून एकाच पोलीस ठाण्यात होते .  दरम्यान येत्या काही दिवसात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या देखील बदल्या केल्या जाणार आहेत . 

Web Title: Internal transfers of 199 Police Officers in Meera Bhayander - Vasai Virar Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.