आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 02:52 PM2018-06-26T14:52:50+5:302018-06-26T14:53:46+5:30
कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि श्वास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मॉडेल महाविद्यालय व साकेत महाविद्यालय येथे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि श्वास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने मॉडेल महाविद्यालय व साकेत महाविद्यालय येथे आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. पूर्वेतील मॉडेल महाविद्यालयात डॉक्टर भूषण पाटील यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी तरुणांनी व्यसनापासून लांब राहिल्यास सुदृढ भारताची निर्मिती होऊ शकते असे मत आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. डॉक्टर विद्याधर गांगण यांनी तरुणांना आपण कशाप्रकारे छोट्या-मोठ्या पार्ट्या करत व्यसनाच्या जाळ्यात अडकतो हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
सकाळी ९ ते १० या वेळेत मॉडल महाविद्यालय कल्याण पूर्व येथे श्वास फाउंडेशन व पोलीस स्टेशनच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. 10.30 ते 12.30 या वेळात साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व येथे डॉक्टर विजय चिंचोळे आणि डॉक्टर शेवाळे यांनी घेतले. डॉक्टर विजय चिंचवड यांनी अमली पदार्थ म्हणजे काय अमली पदार्थाचा वापर कोण कोणत्या वयात केला जातो अमली पदार्थाचे दुष्परिणाम कोणते अमली पदार्थ वापरल्यामुळे मानसिक व शारीरिक कोणता दुष्परिणाम जाणवतो याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉक्टर शेवाळे यांनी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यसनापासून दूर राहिला पाहिजे असे संबोधले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना आम्ही व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली.
पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांनी अमली पदार्थांच्या सेवनानंतर कोणकोणत्या गुणांची नोंद आपल्यावर होते या गुन्ह्यांना किती वर्षाची शिक्षा आहे अमली पदार्थ सेवनासाठी कायद्यात कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
हा संपूर्ण कार्यक्रम श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर पोटदुखी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संपूर्ण कार्यक्रमात २५० वर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.