आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’

By सुरेश लोखंडे | Published: November 2, 2023 04:51 PM2023-11-02T16:51:49+5:302023-11-02T16:52:44+5:30

आंतरराष्ट्रीय पाैष्टीक आहाराचा दिवाळी फराळांचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील टॉऊन हॉल सभागृहात व प्रांगणातील विक्री व प्रदर्शनाकडे ठाणेकरांचे पावले अपसुक वळणार आहे.

International standard 'Nutritious Cereal Diwali Faral' for Thanekar in Town Hall! ' | आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’

ठाणे : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे असल्यामुळे यंदा ठाणेकरांना या पाैष्टीक तृणधान्य दिवाळी फराळाची मेजवाणी प्राप्त हाेणार आहे. त्यासाठी येथील ऐतिहासिक टाउन हाॅलमध्ये या फराळांचे प्रदर्शन व विक्री करण्याचे नियाेजन काेकण विभागीय कृषी सहसंचालकांच्या कर्यालयामार्फत ८ ते ९ नाेव्हेंबर या कालावधीत करण्यात आल्याचे सुताेवाच विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

हा आंतरराष्ट्रीय पाैष्टीक आहाराचा दिवाळी फराळांचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील टॉऊन हॉल सभागृहात व प्रांगणातील विक्री व प्रदर्शनाकडे ठाणेकरांचे पावले अपसुक वळणार आहे. त्याचा लाभ नागरिकांनी माेठ्या संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरडवाहू, दुर्गम भागातील शेतमध्ये घेण्यात येणारी पौष्टिक तृणधान्य पिके ही आराेग्य वर्धक व पाेष्टीक असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी, राजगिरा यांचा समावेश आहे. त्यामुळे या तृणधान्याचे उत्पादन वाढीबरोबर लोकांचे आहारातील प्रमाण वाढवून त्याचे औषधी गुणधर्माची माहिती करून देण्यासाठी, आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे ही २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्यानुसार काेकण विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे यांच्यामार्फत या तृणधान्य दिवाळी फराळाचे प्रदर्शन व विक्रीचे आयाेजन केले आहे.

या प्रदर्शनाच्या व विक्रीच्या दोन्ही दिवशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतील पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योजक, महिला विकास महामंडळ महिला बचत गट व पौष्टिक तृणधान्य विक्री करणारे शेतकरी आदींकडून हे तृणधान्य दिवाळी फराळाचे पदार्थ तयार करण्यात येणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी ९१५२१३१७१८ या नंबरवर अथवा jdathane२०११@gmail.com या ई-मेलवर जाणकारांना संपर्क साधण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.
 

Web Title: International standard 'Nutritious Cereal Diwali Faral' for Thanekar in Town Hall! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.