उल्हासनगरातील अंटेलिया येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा, शेकडो जणांची उपस्थिती
By सदानंद नाईक | Updated: June 21, 2024 17:25 IST2024-06-21T17:23:13+5:302024-06-21T17:25:05+5:30
उल्हासनगरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार व महापालिका निधीतून गोलमैदान येथे योगा केंद्राची स्थापना केली. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आयलानी करतात. यावर्षी अंटेलिया रिजेन्सी येथे योगा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उल्हासनगरातील अंटेलिया येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा, शेकडो जणांची उपस्थिती
उल्हासनगर : आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी दरवर्षीप्रमाणे योगा दिनाचे आयोजन अंटेलिया येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजता करण्यात आले. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिक योगा कार्यक्रमाला उपस्थित होते.
उल्हासनगरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार व महापालिका निधीतून गोलमैदान येथे योगा केंद्राची स्थापना केली. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आयलानी करतात. यावर्षी अंटेलिया रिजेन्सी येथे योगा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी महापौर मीना आयलानी, महेश सुखरामनी, डॉ प्रकाश नाथानी, राजू जग्यासी, मनोहर खेमचंदानी, अर्चना करनकाळे, मंगला चांडा, राम चार्ली पारवानी, डॉ एस बी सिंग, योगेश देशमुख, राकेश पाठक, महेश देशमुख, दीपक अहिरे, लक्की नाथानी, हरेश भाटिया, उमेश पंडित, फुलचंद यादव, सुजित उपाध्याय यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, आघाडी प्रमुख, पंचायत समिती सदस्य, म्हारल, वरप, कांबा, ग्रामपंचायतचे सदस्य आदीजन उपस्थित होते.
तक्षशिला विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला असून शिक्षक कासह शेकडो विध्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नेहरू युवा केंद्रचे सुनील गमरे, तक्षशिला विद्यालयाच्या प्राचार्या विद्या भारसाखळे, उल्हासनगर युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश अहिरे आदीजण उपस्थित होते. शहरात इतर ठिकाणीही आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला आहे.