कारचे सायलेंन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:23 AM2021-07-17T00:23:40+5:302021-07-17T00:35:08+5:30
मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मोटारकारचे सायलेंन्सर चोरुन त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेंन्सर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
कळवा, खारेगाव परिसरात राहणाºया रोशनी राऊत (५२) यांनी त्यांची मोटारकार ५ जून २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. तिचे सायलेन्सर चोरटयांनी लंपास केले होते. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ६ जून रोजी त्यांनी तक्र ार दाखल केली होती. याच घटनेचा तपास करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने कळव्यातील संभावित ठिकाणच्या सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये कारचे सायलेन्सर चोरणारी टोळीच कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरटयांची माहिती मिळवली असता, संशयित आरोपी हे मुंबईतील कुर्ला येथील असल्याची माहिती हाती लागली. पोलिसांनी कुर्ला येथील कपाडियानगर येथून समशुद्दीन शहा तसेच नदीम उर्फ नेपाळी नबाब कुरेशी (२१, रा. कुर्ला), समशुद्दीन मुजूउद्दीन (२२,) आणि सदाम खान (२६, रा. कलीना डोंगर, कुर्ला ) या चौघांना १३ जुलै रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी पुण्यातील चाकण, ठाण्यातील कळवा, कल्याण, विरार आदी २५ ठिकाणी चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेंन्सर जप्त केले आहेत.
* यातील समशुद्धीन हा रायगड जिल्हयातील वेगवेळया पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल असलेल्या दहा गुन्हयांमध्ये पोलिसांना वांन्टेड होता. या टोळीकडून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि पुणे जिल्हयासह गोवा राज्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.
* प्लाटेनियमसाठी व्हायची चोरी-
कारचे सायलेंन्सर चोरल्यानंतर त्यातील जाळी काढून त्याची पावडर बनविली जायची. ती भट्टीवर वितळून त्यातून १० ग्रॅम प्लाटेनियम काढले जायचे. याच प्लाटेनियमची प्रती ग्रॅम दोन हजारांप्रमाणे दहा ग्रॅमला २० हजार रुपये, अशी विक्री केली जात होती. पुन्हा त्याच सायलेंन्सरची जुन्या बाजारात ही टोळी विक्री करीत होती.