कारचे सायलेन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:24+5:302021-07-17T04:30:24+5:30

ठाणे : मोटारकारचे सायलेन्सर चोरून त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, ...

Interstate gang arrested for stealing car silencers | कारचे सायलेन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

कारचे सायलेन्सर चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

Next

ठाणे : मोटारकारचे सायलेन्सर चोरून त्याची पावडर बनवून तिची विक्री करणाऱ्या समशुद्दीन मोहंमद अदिस शहा (२१, रा. मोहम्मद इस्टेट, बीकेसी कुर्ला, मुंबई) याच्यासह चार जणांच्या आंतरराज्य टोळीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेन्सर जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

कळवा, खारेगाव परिसरात राहणाऱ्या रोशनी राऊत (५२) यांनी त्यांची मोटारकार ५ जून २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. तिचे सायलेन्सर चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ६ जून रोजी त्यांनी तक्रार दाखल केली होती. याच घटनेचा तपास करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने कळव्यातील संभावित ठिकाणच्या सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये कारचे सायलेन्सर चोरणारी टोळीच कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची माहिती मिळवली असता, संशयित आरोपी हे मुंबईतील कुर्ला येथील असल्याची माहिती हाती लागली. पोलिसांनी कुर्ला येथील कपाडियानगर येथून समशुद्दीन शहा तसेच नदीम ऊर्फ नेपाळी नबाब कुरेशी (२१, रा. कुर्ला), समशुद्दीन मुजूउद्दीन (२२) आणि सदाम खान (२६, रा. कलिना डोंगर, कुर्ला ) या चौघांना १३ जुलै रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख ५० हजारांचे २५ सायलेन्सर जप्त केले आहेत.

* यातील समशुद्दीन हा रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल असलेल्या दहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. या टोळीकडून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यासह गोवा राज्यातील २५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Web Title: Interstate gang arrested for stealing car silencers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.