तपास पथक केरळमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:36 AM2017-08-17T05:36:28+5:302017-08-17T05:36:30+5:30
बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचा चमू केरळ येथे पोहोचला आहे.
ठाणे : बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेचा चमू केरळ येथे पोहोचला आहे. या प्रकरणाशी संबंधित काही आरोपी केरळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली.
बनावट सीडीसी उमेदवारांना ५० हजार ते लाख रुपयांत विकणाºया अब्दुला मनत्तुमपाडत हकीम, विजयन गोपाल पिल्ले आणि अलीम मोहद्दीन मुसा यांच्यासह सूत्रधार प्रदीप ऊर्फ दिनेश शंकर रौधळ याला पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. आरोपींकडून पोलिसांनी ३७ बनावट सीडीसी आणि २६ वैध पासपोर्ट जप्त केले होते.
आरोपींकडून जप्त केलेले बहुतांश पासपोर्ट केरळमधील रहिवाशांचे आहेत. ते पासपोर्टधारक बनावट सीडीसीसाठी आरोपींच्या संपर्कात होते की, आरोपींचे हस्तक म्हणून कार्यरत होते, याचा तपास करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चा चमू केरळमध्ये दाखल झाला आहे. सर्व संशयितांचा तपशील पोलिसांनी मिळवला असून, जबाब नोंदविण्याचे काम हा चमू करत आहे. या जबाबातून संशयितांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करायची की नाही, हे ठरवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>पाकिस्तानी शिक्के
आरोपींकडून जप्त केलेल्या बनावट सीडीसींपैकी एका सीडीसीवर पाकिस्तानी शिक्के आढळल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाºयांना विचारणा केली असता, एका सीडीसीच्या कव्हरवर पाकिस्तानी शिक्का आढळल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी शिक्का असलेले ते केवळ कव्हर होते. त्यामध्ये कोणतेही प्रमाणपत्र नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.