गुंजाळप्रकरणी तपास महिनाभरातच थंडावला
By admin | Published: January 26, 2016 02:00 AM2016-01-26T02:00:42+5:302016-01-26T02:00:42+5:30
रमेश गुंजाळ हत्या प्रकरणाला महिना झाला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या १३ पैकी ७ आरोपींना अटक झालेली
अंबरनाथ : रमेश गुंजाळ हत्या प्रकरणाला महिना झाला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या १३ पैकी ७ आरोपींना अटक झालेली असून उर्वरित सर्व आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. तर, प्रमुख आरोपींना हत्येसाठी कोणी मदत केली, याचाही अद्याप शोध लागलेला नाही.
२५ डिसेंबरला गुंजाळ यांची काही मारेकऱ्यांनी हत्या केली होती. गावातील वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील चार आरोपींनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली तर तर इतर तिघांना पोलिसांनी अटक केली. सचिन चव्हाण, संदीप गायकर, विशाल जव्हेरी, दीपक काळिंब, अभिषेक (गुड्डू) वारगडे, ओंकार गायकर आणि रामदास गायकर या सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर, या प्रकरणातील इतर ६ आरोपी अद्यापही फरार आहेत.
या प्रकरणात ज्या आरोपींनी मदत केली आहे, त्यांच्यावरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा तपास थंडावल्याचे चित्र शहरात दिसत आहे. याबाबत त्यांच्या निकटवर्तियांमध्ये नाराजी असून पत्रकार परिषदेत गुंजाळ यांच्या पत्नीचा हाच संताप व्यक्त झाला. (प्रतिनिधी)