गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 12:08 AM2019-07-04T00:08:14+5:302019-07-04T00:08:44+5:30

पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते.

 Investors have cheated one crore fraud, invested 597 investors | गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

Next

ठाणे : सुवर्णयोजनेमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार (५१) या ज्वेलर्समालकाला ठाणे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या योजनेतून ५९७ जणांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याचे नौपाडा पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.
पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते. त्याच्या योजनेनुसार १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे ठरले होते. त्यानुसार, त्याने काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला. काहींना पैसे आणि सोनेही मिळवून दिले. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात राबवलेल्या या योजनेमध्ये रामचंद्रनगर, वैतीवाडीतील प्रिया जाधव आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रतिमहिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. त्यांना मुदतपूर्तीनंतर देय असलेली ३६ हजारांची रक्कम त्याने दिलीच नाही. अशा प्रकारे सुमारे १५० गुंतवणूकदारांकडून चार लाख १७ हजार ५०० रुपये त्याने उकळले. याप्रकरणी २७ जून २०१७ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि संजय धुमाळ यांच्या पथकाने शेलारला काही तासांमध्ये अटक केली.
चौकशीमध्ये या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले आहे. पाच दिवसांमध्ये ५९७ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ११ लाखांची रक्कम शेलारने उकळल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने सुमारे ६०० जणांची अशा प्रकारे एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासामध्ये उघड झाले आहे. यात आणखीही आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या गुंतवणूकदारांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोंडकर यांनी केले आहे.

दलालांना एक ते तीन टक्क्यांची ‘बक्षिसी’
कळवा, रामचंद्रनगर, नौपाडा, पाचपाखाडी आदी ठाणे परिसरातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. काहींना त्याने दलाल म्हणून नियुक्ती करून त्यांना एक ते तीन टक्केदलाली तो ‘बक्षिसी’ म्हणून देत होता. अशा सुमारे ४०० दलालांनी त्यांचे मित्र, नातेवाइकांना या सुवर्णभिशीच्या भरीस पाडले. दलालांना या साखळीतून पैशांचा परतावा मिळण्यासाठी त्याने एका संगणकीय सॉफ्टवेअरचाही उपयोग केला होता. चार पगारी कर्मचारीही त्याने आपल्या दुकानात या योजनेसाठी नेमले होते.

Web Title:  Investors have cheated one crore fraud, invested 597 investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.